शूटिंगच्या वेळी असं काय घडलं कि डर चित्रपटानंतर सनी देओल १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही

0
444
- Advertisement -

नंतर त्यांना विचारण्यात आलं कि त्या घटनेनंतर आतापर्यंत त्यांनी शाहरुख खानशी बोलणं नाही केलं, हे खरं आहे का. त्यावर सनीने सावध उत्तर दिले कि, “गोष्ट अशी नाही कि मी बोलणं नाही केलं. मला माहिती नाही नक्की काय आहे, पण जेव्हा अशाप्रकारच्या घटना होतात त्यानंतर मी नेहमी स्वतःला अश्या गोष्टींपासून बाजूलाच ठेवतो. तसेही मी कुठे सोशिलाईज करतो कि कुणाशी भेटू किंवा कोणाबरोबर बोलू. तर कधी आम्ही भेटलोच नाही, तर बोलण्याचा काही प्रश्नच नाही येत. तसेही मी कोणत्या फंक्शनला नाही जात, पार्टीला नाही जात. आम्ही एकाच फिल्डचे असून देखील मग संपर्क नाही होत.” त्यानंतर त्याला विचारण्यात आले कि म्हणजे एक गोष्ट खरी आहे कि जर तुला कोणावर राग आला असेल तर मग तू त्या व्यक्तीपासून स्वतःला लांबच ठेवतो. त्यावर सानी देओल जोरात हसला आणि म्हणाला, “एखादी गोष्ट, ज्यात काहीच नाही आहे, त्याला बाजूला करा. त्यानंतर ती व्यक्ती काहीच करू शकत नाही.”

- Advertisement -

सनी ने सांगितले कि, “डर चित्रपटात लोकांना मी आवडलो, लोकांना शाहरुख सुद्धा आवडला. चित्रपटाशी मला फक्त इतकीच समस्या होती कि मला माहिती नव्हतं कि चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेला इतके महत्व होते. मी चित्रपटात नेहमी खुल्या मनाने आणि लोकांवर संपूर्ण विश्वास ठेवून काम करतो. परंतु दुर्भाग्य असे कि काही लोकं आणि अभिनेते असे आहेत ज्यांना विश्वासाने काम करायला आवडत नाही. कदाचित ते अश्या प्रकारेच स्टारडम मिळवू इच्छितात.” खरंतर सनी देओल त्यावेळी खूप मोठा स्टार होता त्यामुळे डायरेक्टर यश चोप्रा ह्यांनी त्याला हि ऑफर दिली होती कि तू राहुल मेहरा किंवा सुनील मल्होत्रा ह्या दोघांपैकी एक भूमिकेची निवड. सनी देओलला वाटले कि त्याच्यासाठी सुनील मल्होत्राची सकारात्मक भूमिका त्याच्यासाठी योग्य राहील. ह्यामुळे त्याने हि भूमिका निवडली.

ह्याअगोदरच्या एका इंटरव्यू मध्ये सनी देओल ने खुलासा केला होता कि, “जेव्हा ‘डर’ चित्रपट बनवला तेव्हा मला ह्या गोष्टीबद्दल सांगितले नव्हते कि ह्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेला हिरोपेक्षा जास्त दमदार प्रकारे दाखवले जाणार. मी माझ्या चित्रपटाबद्दल अगोदरच निर्मात्यांकडून सर्व गोष्टी जाणून घेतो. परंतु जेव्हा मला माहिती पडलं कि ह्या चित्रपटाचा शेवट काही अश्या प्रकारे होणार आहे तर मी ह्या दगाबाजीच्या गोष्टीने हैराणच झालो होतो. मला खोटं सांगितलं गेलं होतं. आणि सनी देओलला वाटलं कि ह्या सर्व गोष्टी यश चोप्रांसोबत शाहरुखलाही माहिती होत्या. परंतु शाहरुखने कधीच त्याच्या आणि सनी देओलच्या भूमिकेबद्दल कधीच सनी देओलला सांगितले नाही. यश चोप्रा आणि शाहरुख खान दोघांनी भूमिकेबाबत सनी देओलला अंधारातच ठेवले. हेच कारण होते कि ‘डर’ चित्रपटानंतर सनी देओलने शाहरुखसोबत बोलणं बंद केलं. तेव्हापासून ते आजपर्यंत तो १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही. त्यानंतर तब्बल १६ वर्षानंतर सुभाष घईंनी एका अँनिव्हर्सरी इव्हेंटमध्ये दोघांची भेट घालून दिले, तेव्हा कुठे दोघांचे बोलणे झाले. ह्याच चित्रपटानंतर सनी देओलने कधीच यश चोप्रा ह्यांच्या चित्रपटातसुद्धा काम केले नाही. बघा सनी देओलने मुलाखत दिलेली तो व्हिडीओ.

 

- Advertisement -