शूटिंगच्या वेळी असं काय घडलं कि डर चित्रपटानंतर सनी देओल १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही

0
449
- Advertisement -

शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला ह्यांचा ‘डर’ चित्रपट तर तुम्हांला लक्षातच असेल. ह्या चित्रपटाने एका बाजूला शाहरुख खानच्या करिअरला एक नवीन उंची दिली, तर दुसरीकडे बॉलिवूडच्या दोन स्टार्स शाहरुख आणि सनी देओल ह्यांच्या मधील वादाचे कारण सुद्धा हाच चित्रपट बनला. ह्या चित्रपटानंतर सनी देओल शाहरुख खान सोबत तब्बल १६ वर्ष बोलला नाही. सनी देओलला रजत शर्माच्या ‘आप कि अदालत’ ह्या शो मध्ये जेव्हा विचारण्यात आले कि, सनी राग फक्त स्क्रिनवरच नाही तर आम्हांला माहिती पडलं कि खरोखर मध्ये सुद्धा जेव्हा तू ‘डर’ चित्रपट करत होता तेव्हा तुझा इतका धसका होता कि संपूर्ण युनिट अगदी डायरेक्टर पासून ते शाहरुख खान पर्यंत सर्व तुला घाबरत होते. नक्की काय घडलं होतं तेव्हा, ज्यामुळे तुला इतका राग आला होता. ह्यावर सनी देओल हसतच म्हणाला, “ते घाबरत होते कारण त्यांच्या मनातच काहीतरी खोट होती.” ह्यावर स्पष्टीकरण देताना सनी देओल म्हणाला कि, “कधी कधी काही गोष्टी घडत असतात, ज्या मला योग्य वाटत नाहीत. आणि त्यानंतर मग मी बैचेन होतो. आणि तीच गोष्ट ‘डर’ चित्रपटाची शूटिंग करतेवेळी झाली.”

- Advertisement -

पुढे सनी देओल म्हणाला, ” घडलं असं होतं कि, त्यावेळी एक सीन करायचा होता. शाहरुख मला सुऱ्याने मारतो. त्यावर माझा खूप मोठा वाद झाला होता. माझे म्हणणे होते कि, बघा मी एक कमांडो ऑफिसर असून मी इतका एक्स्पर्ट आहे, इतका फिट आहे. आणि हा मुलगा आहे, हा मला कसे काय मारू शकतो. तो मला मारू शकतो पण जर मी त्याला पाहत नसेल तरच. मी त्याला बघतोय आणि तो मला सुऱ्याने मारतोय तर मी कसला कमांडो राहिलो मग. बरोबर ना. तर त्या गोष्टीवर थोडासा वाद चालू होता. त्यावेळी मला कळत नव्हते कि मी नक्की काय करू. आणि मी काही करू सुद्धा शकत नव्हतो. कारण यश चोप्रा हे वरिष्ठ आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे मी त्यांना काही बोलू सुद्धा शकत नाही. त्यावेळी मला इतका राग आला होता आणि मी तेव्हा माझे हात जीन्स मध्ये घातले होते. आणि मला माहितीच नव्हतं कि माझ्या अंगात इतका राग होता कि माझ्या हाताच्या प्रेशरने संपूर्ण पॅन्ट खिस्यापासून फाटली. आणि हि घटना घडली. त्यानंतर मी पाहिलं कि कोणी एका बाजून घाबरून पळू लागलं आहे. तर कुणी दुसऱ्या बाजूला घाबरून पळतोय. उलट मी कोणाला काही करत नव्हतो. मी कोणतेही चुकीचे सुद्धा काही करत नव्हतो. फक्त मलाच माहिती नव्हतं कि मी नक्की काय करत आहे ते.”

- Advertisement -